
जिल्हाधिकाऱयांची परवानगी नसताना जहाजावरील कर्मचाऱयांना हॉटेलमध्ये उतरवल्याबद्दल गणपतीपुळे व जयगड येथील तीन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
जयगड येथील डॉकयार्डमध्ये दुरुस्ती हाती आलेल्या प्रिया -२३मुंबई व अबुजा या जहाजावरील कर्मचाऱयांना जिल्हाधिकार्यांच्या मनाई आदेश असताना देखील कोणतेही परवानगी न घेता हॉटेलमध्ये उतरण्यास परवानगी दिल्याबद्दल गणपतीपुळे येथील हॉटेल अभिषेक ,हॉटेल एक दंत तसेच जयगड येथील हॉटेल विसावा यांच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या जहाजावरीलआलेल्या कर्मचाऱयांपैकी चार कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यामुळे खळबळ उडाली होती
www.konkantoday.com