
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील उर्वरित महिलांचे आधार संलग्न करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील ३० हजार ७३४ महिलांचे आधार त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित रहावे लागले आहे. या सर्व महिलांचे आधार बँक खात्याशी संलग्न झाले की नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना देण्यात आली असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.१ सप्टेंबर ते २० सप्टेंबर कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ८४० महिलांनी अर्ज दाखल केले. यापैकी ३ लाख ९६ हजार २०८ महिलांच्या अर्जाला तालुका स्तरानंतर आता जिल्हास्तरावर मंजुरी मिळाली आहे.www.konkantoday.com