
राज्यभरातील बस स्थानकाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांची उद्या निदर्शने.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांची वेतवाढ, थकबाकी, महागाई भत्ता आदी मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर ५ मार्च रोजी राज्यातील सर्व बस स्थानके आणि आगारांच्या बाहेर निदर्शने करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना २०१८पासून महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच सन २०१६-२० कालावधीत एकतर्फी लागू केलेल्या वेतनवाढीत घरभाडे भत्त्याचा दर वाढवून द्यावा. या वेतनवाढीतील घरभाडे भत्त्याची रक्कमदेखील थकित आहे, अशा अनेक मागण्यांबाबत कामगार संघटनांकडून वारंवार बैठका घेऊन आश्वासने देण्यात आली आहेत. अद्याप याबाबत कुठलाच निर्णय घेतला जात नसून, संघटनेकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.