
फाटक हायस्कूलमध्ये रंगले मंगळागौरीचे खेळ
रत्नागिरी : प्रतिनिधी
परंपरागत चालत आलेल्या गाण्यांच्या तालावर ‘फुगडी, बस फुगडी, सासू-सून भांडण, झिम्मा, अडवळ घूम-पडवळ घूम’ असे विविध मंगळागौरीचे खेळ रंगले ते रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये. पारंपरिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी व शिक्षिका यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाचा आनंद लुटला.
दि न्यु एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमध्ये 1 रोजी ‘श्रावणी शुक्रवार’ हा कार्यक्रम झाला. मंगळागौरीच्या कहाणी वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. खेळांचे महत्त्व रेणुका भडभडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन पूर्वा जाधव व प्रीती हातिसकर यांनी केले.
इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थिनी व शिक्षिका यात सहभागी झाल्या होत्या. स्मिता लिमये यांनी पारंपरिक गाणी म्हणून कार्यक्रमात रंगत आणली. स्नेहाली खेडसकर, सुनीता गावित, कीर्ती माढे, हर्षदा एकावडे, स्वप्ना नार्वेकर, निवेदिता कोपरकर, तीर्था कीर, साक्षी राठोड, कीर्ती दाते या शिक्षिकांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक भास्कर झोरे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी, सचिव दिलीप भातडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ऐतिहासिक आणि वर्तमान असे दोन्ही काळ अनुभवण्याची पर्वणी यावेळी उपस्थितांना या खेळांतून मिळाली.
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराचा व्यायाम होतो. नेहमीच्या जबाबदार्यांतून महिलांना या खेळांद्वारे आनंदही मिळतो. आपली संस्कृती जोपासण्यात व त्याचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे मत यावेळी मुख्याध्यापक राजन कीर यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com