
कोल्हापुरातील जनता कर्फ्यू ला छोट्या व्यापार्यांचा विरोध
कोल्हापूरच्या महापौरांनी केलेले ऐच्छिक जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन आणि चेंबर ऑफ कॉमर्सने शुक्रवारपासून सहा दिवस शहरातील व्यापार, व्यवसाय बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. रिक्षाचालक, फेरीवाले, छोटे व्यावसायिक, रेडिमेड कपड्यांंचे दुकानदार, रोजंदार मजूर आणि सर्वसामान्यांनी या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. 70 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाचा फैलाव रोखला जाऊ शकत नसेल तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत असून, आता कुठे रुळावर येत असलेल्या व्यापार, व्यावसायांवर पुन्हा एकदा ‘जनता कर्फ्यू’मुळे गंडांतर येणार आहे.
www.konkantoday.com