ज्ञानदीप भडगावच्या संवेग मरजे व हर्ष बांगर यांची बालवैज्ञानिक म्हणून निवड खेड खाडीपट्टा ( प्रतिनिधी )

मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात येणार्‍या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव येथे इ. 6 वीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी संवेग भरत मरजे व हर्ष राजकुमार बांगर यांना डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक प्राप्त झाले आहे या दोन्ही विद्यार्थ्यांनी फॅशन आणि पर्यावरण या विषयावर प्रकल्प सादर केला होता. संवेगला रौप्य पदक व हर्ष यास कांस्य पदक प्राप्त झाले आहे. दोघांचीही बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे सदर विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक रागिणी जामकर व विनोद टेंबे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकाल्पकार्यात ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्राचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे, डॉ. विपुल संसारे तसेच डॉ. रमणलाल तलाठी, डॉ. उमेशकुमार बागल, खेड नगरपरिषदे तील नागेश बोंडले, मुक्ताई तिर्थकर, दिपा चव्हाण तसेच पालक यांचेही या दोघांच्या यशात सहकार्य लाभले आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढ्ढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button