तळ कोकणात वेंगुर्ल्यात सर्वाधिक पाऊस

गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २२७.६ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८७.२ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ८३ (१८०३), सावंतवाडी ४५ (१३५९), वेंगुर्ला २२७.६ (१८३७.०४), कुडाळ ८८ (१५९३), मालवण ४७ (१३१३), कणकवली ११४ (१८४४), देवगड १८ (१२५६), वैभववाडी ७५(१८४३) पाऊस झाला आहे. १जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०५ मि.मी पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात सरासरी २१८४.७८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button