
माझे कुटुंब माझी जबाबदारी स्पर्धांना जिल्हयात भरघोस प्रतिसाद
रत्नागिरी : जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या कोरोना विषाणू रोखण्यासाठीच्या मोहिमेसाठी जिल्हयात वेगवेगळया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांना जिल्हयात भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला तसेच व्हीडीओ बनविण्याच्या स्पर्धांसाठी जिल्हयातून सर्वच तालुक्यातून प्रवेशिका प्राप्त होत आहे. या प्रवेशिकाद्वारे आलेले निंबध, व्हिडीओ आदी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या तर्फे खास फेसबुक पेज करुन त्यावर टाकण्यात येत आहेत.
नागरिकांनी या पेजला भेट दिल्यास त्यांना आपल्या तसेच इतर स्पर्धकांच्या प्रवेशिका बघता येतील. यासाठी सर्वांनी खालील लिंकचा वापर करावा.
http://m.facebook.com/ratnagirimkmj/?ref=page_internal&mt_nav=० यात अधिकाधिक जणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
www.konkantoday.com