भोस्ते घाटातील वळणावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला, राष्ट्रीय महामार्ग खाते मात्र अजूनही निद्रीस्त.

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघातांच्या मालिकांचे सुरू झालेले सत्र आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने आता त्या रोखण्यासाठी चक्क पिंपाचा अवलंब करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या तकलादू उपाययोजनांबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील तीन की.मी.च्या भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने प्रवास सुसाट अन वेगवान झाला आहे. घाटातील अवघड वळण डेंजरझोनमध्येच असून अपघातांचे सत्र सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी बसवण्यात आलेले १३ गतिरोधकही कुचकामी ठरले आहेत. संरक्षण भिंतीवर करण्यात आलेला टायर तंत्रज्ञानाचा अवलंबही फोल ठरल असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. सद्यस्थितीत भोस्ते घाटातील वळणावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. दरडी कोसळून दुर्घटनेसह वाहतूक ठप्प होण्याचा धोका कायम असतानाही राष्ट्रीय महामार्ग खाते मात्र अजूनही निद्रीस्त आहे. सूचना फलकांसह आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करण्याची तसदी महामार्ग खात्याने अद्याप घेतलेली नाही. यामुळे चौपदरीकरणानंतर सुसाट झालेल्या प्रवासात दरडीचे विघ्न निर्माण झाले आहे. या ठिकाणाहून मार्गस्थ होणार्‍या वाहनांचा वेगही मंदावला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button