
एलईडी दिव्याच्या प्रकाशझोतात मासेमारी, तिघांविरूद्ध कारवाईसाठी प्रस्ताव दाखल
दिव्याच्या प्रकाशझोतात मासेमारी तसेच अनधिकृत मासेमारी केल्याचा आरोप ठेवून तीन नौका मालकांविरूद्ध शास्तीची प्रकरणे अभिनिर्णय अधिकार्यांकडे सादर करण्यात आली आहेत.१८ एप्रिल रोजी एलईडीच्या प्रकाशझोतात मासेमारी तसेच अनधिकृत मासेमारी ३ नौकांनी केल्याचे गस्तीवरील तटरक्षक दलाच्या जवानांना आढळले. त्यांनी या नौका चालकांना रोखले. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. नौकांच्या कामाविषयी अनेक आक्षेपार्ह मुद्दे तटरक्षक दलाच्या जवानांच्या लक्षात आले. त्यांनी या तीन नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांकडे सुपूर्द केल्या.अंमलबजावणी अधिकारी तृप्ती जाधव यांनी या प्रकरणात सखोल तपास केला आणि अभिनिर्णय अधिकारी अभयसिंह शिंदे इनामदार यांच्यासमोर नौका मालकांविरूद्ध कारवाईकरिता प्रतिनिवेदन सादर केले. सल्लाउद्दीन मोहम्मद म्हसकर, शिफा फायिज होडेकर, नाझिया इम्रान मुल्ला यांच्या विरूद्ध कारवाई प्रस्ताव करण्यात आला आहे. www.konkantoday.com