
रत्नागिरी जिल्हयामध्ये उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओमुक्त जग करण्याचा निर्धार केलेला आहे . त्यानुसार युध्द पातळीवर सर्व स्तरावर पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे .रत्नागिरी जिल्हयामध्ये १९९ ८ पासुन गेली २२ वर्षे एकही पोलीओचा रुग्ण आढळून आलेला नाही. माहे २७ मार्च २०१४ रोजी देशाला पोलीओ मुक्त झाल्याबाबतचे प्रशस्तीपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले आहे.दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ जिल्हयातील ग्रामीण भागामध्ये ७४२७३ व शहरी भागात १३३८३ असे एकुण ८७६५६ लाभार्थीना लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्हयामध्ये ग्रामीण भागामध्ये १८५२ व शहरी भागात ८३ लसीकरण बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच ३६ ट्रान्झीट टीम रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे नियुक्त करण्यात आलेल्या आहेत . तसेच ११३ मोबाईल टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. एकुण ४१०६ कर्मचाऱ्याची लसीकरण केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
www.konkantoday.com