
जिल्हा परिषद प्रशासन उशीरा येणार्या् कर्मचार्याना शिस्त लावणार
जिल्हा परिषद स्तरावरील सर्व विभागांमध्ये कर्मचार्यांना मुक्त वाव मिळालेला असताना अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. नियमित हजेरीसाठी ऑनलाईन बायोमेट्रीक यंत्रणा कार्यरत आहे. पण या यंत्रणेद्वारे कर्मचारी नियमित थम्स व गुगल शिटमध्येही नोंद करत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्व खातेप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचार्यांसच्या बायोमेट्रीक हजेरीचा दरमहा अहवाल देण्याच्या सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com