
शकील गवाणकर यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर
रत्नागिरी.. सुमारे 25 वर्षे सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच गेली 8 वर्षे सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले शकील गवाणकर यांच्या कार्याची दखल स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्फे कोकणरत्न पुरस्कार अभियानाचे अध्यक्ष धनंजयजी कुसवेकर यांनी जाहीर केले आहे त्याबाबतचे पत्र त्यांना पाठविण्यात आले आहे.
स्वतंत्र कोकण अभियानाचे संस्थापक संजयजी कोकरे यांनी शकील गवाणकर यांचे अभिनंदन केले आहे.
स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्फे मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत निवडक व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन,आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे होणार आहे.
शकील गवाणकर यांना पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.शकील गवाणकर हे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष आहेत.




