
राज्यभरात क्षयरोगाच्या औषधांसाठी तुटवडा रत्नागिरीजिल्ह्यात महिनाभर पुरेल इतकाच औषधसाठा
राज्यभरात क्षयरोगाच्या औषधांसाठी तुठवडा असल्याची स्थिती समोर येत आहे. सुमारे महिनाभर पुरेल इतकाच औषधसाठा जिल्हास्तरावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. हा औषधसाठा संपल्यास महिनाभरानंतर जिल्ह्यात उपचाराखालील 859 रुग्ण व गंभीर (एमडीआर) 134 क्षयरुग्णांसमोर औषधांचा पश्न उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.क्षयरुग्णांच्या औषधांच्या पुरवठ्यासमोर केंद्रीय क्षयरोग विभागाने 18 मार्चला सर्व राज्य क्षयरोग अधिकाऱयांना पत्र पाठविले. क्षयरोगाचा विळखा कमी करण्यासाठी दरवर्षी 24 मार्च हा ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळण्यात येतो. केंद्र शासनाने 2025 ला क्षयरोग निर्मूलन करण्याचेही ध्येय ठेवलेले आहे. क्षयरोगाची औषधे केंद्राकडून राज्याला येतात. मात्र, येथे राज्य क्षयरोग विभागाच्या काही औषध केंद्रांना औषधांचा पुरवठा नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य आरोग्य विभागाने क्षयरोगाच्या औषधांच्या खरेदीसाठी निविदाही काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.www.konkantoday.com