
लांजा तालुक्यात खरिपासाठी युरियाचा तातडीने पुरवठा व्हावा -शेतकरी संघटनेची मागणी
यावर्षी भरपूर पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची पेरणी व लागवड होणार आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताचा तातडीने पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.तालुका शेतकरी संघटनेने तालुका कृषि अधिकारी यांची भेट घेवून तालुक्यासाठी मे महिना अखेर युरियाचा पुरवठा होणे आवश्यक असून याबाबतीत किती टन युरिया लागणार आहे, याचे नियोजन तातडीने करावे याबाबत चर्चा केली.केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तालुक्यात युरिया खताची जादा दराने विक्री होत आहे. हे कृषी विभागाच्या अधिकार्यांना माहिती असूनही त्यांचे शेतकर्यांच्या होणार्या लुटीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. www.konkantoday.com