
माथेरानच्या 1200 फुट खोल दरीत प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकरचा मृतदेह सापडला,
बंगळुरूचे सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि प्राध्यापक शणमुगा एस. बालासुब्रमण्यन यांचा मृतदेह रविवारी माथेरानमध्ये आढळला. ते 58 वर्षांचे होते. प्राध्यापक बालासुब्रमण्यन एका कंपनीच्या व्यवस्थापन टीमला मार्गदर्शन करण्यासाठी माथेरानमध्ये आले होते.
किंग जॉर्ज व्ह्यू पॉइंट क्लिफवरून अंदाजे 1200 फूट खोल दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 15 ऑक्टोबरच्या सकाळी हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांचा शेवटचा फोटो सीसीटीव्हीमध्ये टिपला
शणमुगांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी माथेरान पोलिसांनी सोशल मीडियावर मोहीम राबवली. त्यानंतर हॉटेलमालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला. अद्याप पोलिसांसाठी हे स्पष्ट झालेले नाही की, प्राध्यापक बालासुब्रमण्यन यांचा मृत्यू अपघातामुळे दरीत कोसळल्याने झाला की त्यांनी आत्महत्या केली. व्ह्यू पॉइंटवरील रेलिंग तुटलेले नसल्यामुळे अपघाताची शक्यता कमी आहे, असे पोलिसांनी सांगितले.




