
गुहागर तालुक्यातील पाहिले खाजगी कोव्हिडं केअर हॉस्पिटल शुंगारतळी येथे आज पासून सुरू
गुहागर तालुक्यातील पाहिले खाजगी कोव्हिडं केअर हॉस्पिटल शुंगारतळी येथे आजपासून सुरू होत आहे.गुहागर तालुक्यातील ,
काही डॉक्टरांनी एकत्र येत हे शुंगारतळी कोविड केअर सेंटर हॉटेल रेम्बो या ठिकाणी सुरु केले आहे. तालुक्यातील नागरिकांना कोरोनावर उपचार घेण्यासाठी गुहागर तालुका सोडून इतर ठिकाणी जावे लागत असे अशा वेळी ही सुविधा सुरू झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णावर या ठिकाणी उपचार होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याठिकाणी सुसज्ज अशी यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोबाईल एक्स-रे मशीन, ऑक्सिजन, ॲम्बुलन्स, त्याचबरोबर सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com




