
खेड तालुक्यातील धामणदेवी येथील भूमी अभिलेखच्या सेवानिवृत्त उपअधीक्षक, कर्मचार्यावर गुन्हा
खेड तालुक्यातील धामणदेवी येथील एका वृद्धाची ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील भूमी अभिलेखच्या सेवानिवृत्त उपअधिक्षकासह मोजणी कर्मचार्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च २०२३ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.याबाबत पांडुरंग रामचंद्र पेवेकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यांच्या मालकीच्या जमीन मिळकत नंबर १४४/११ ब/१२ पैकी क्षेत्र ०-३४-०० पैकी ०-२७-०० हेक्टर एवढ्या जागेची मोजणी करण्यासाठी मोजणी जमीन मिळकत जंगल भागात असणार्या जागेची होणार नाही, असे खोटे सांगून २८ मार्च २०२३ रोजी ५० हजार रुपये, नंतर २० हजार रुपये स्वीकारत चुकीचा नकाशा दिला.www.konkantoday.com