
कोतवडा ग्रुप ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगासाठी विकास आ-आराखड्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन
कोतवडा ग्रुप ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगासाठी विकास आ-आराखड्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच प्रिती बारगोडे यांनी महिलाना अवाहन केले की 15व्या वित्तआयोगाबाबतची कामे सुचवावी त्या मध्ये आरोगय विषयक,सांडपाणी निर्मुलन, पिण्यासाठीच्या पाण्यासंबधी,याबाबतची कामे सुचवावी.त्याप्रमाणे सदस्या प्रज्ञा मोडक यांनी डास निर्मूलना बाबत व गावातील स्वच्छता बाबतची कामे सुचवली या वेळी ग्रामविकास आधिकारी डि.एस.इंगळे,स्वप्निल मयेकर,चंद्रकांत पालवे,अनुजा कांबळे,पोलीस पाटील वैष्णवी माने,अनिता नेवरेकर आदी उपस्थित होते.