
दिवाळीत वंदे भारतच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार..
आता दिवाळीत कोकणवासीयांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. दिवाळीत वंदे भारतच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवासाचा कालावधी खूप वाचला आहे. यामुळे अनेक प्रवासी वंदे भारतने प्रवास करतात. प्रवाशांकडून ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक ट्रेनचे कोचदेखील वाढवण्यात आले आहेत.सध्या सीएसएमटी स्थानकांवरुन गोवा मडगाव स्थानकापर्यंत वंदे भारत चालवली जाते. दिवाळीच्या कालावधीत वंदे भारतच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधी रेल्वे गाड्यांचा वेग मंदावतो. अनेक रेल्वे रद्द होतो. या कालावधीत जवळपास मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनच्या १०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता दिवाळीच्या कालावधीत वंदे भारतच्या फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या वंदे भारत ट्रेन आठवड्यातून तीन दिवस चालवली जाते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस ट्रेन चालवली जाते.त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यापासून वंदे भारत ट्रेनची संख्या वाढणार आहे. आता २२ ऑक्टोबरपासून फक्त शुक्रवार वगळता संपूर्ण आठवडा ही ट्रेन चालवली जाणार आहे.




