
आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक
आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. काही वेळातच गुहागर शृंगारतळी येथे निलेश राणे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी निलेश राणे चिपळूणकडून गुहागरच्या दिशेने निघाले असताना हा सगळा प्रकार घडला आहे.
गुहागर येथील सभेसाठी भाजप नेते निलेश राणे जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
www.konkantoday.com