
आ. उदय सामंत यांनी हस्तक्षेप केल्याने विस्तारित पाणी योजनेला मिरजोळे गावातील अडथळा दूर
रत्नागिरी ः रत्नागिरी शहराला विस्तारित पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर आता त्या योजनेचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असताना मिरजोळे येथे या पाईपलाईन टाकण्याला विरोध झाला होता. पण आता आमदार उदय सामंत यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवींनी हा प्रश्न निकाली काढल्याने आता शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉप पर्यंतचा मार्ग मोकळा झाला आहे.
जवळपास ६३ कोटी खर्चाची रत्नागिरी शहराची विस्तारित नळपाणी योजना शासनाने मंजुर केली आणि त्याचे कामही सुरू झाले. दरम्यान साळवी स्टॉप ते शीळ दरम्यानच्या मार्गावरती पाईपलाईन टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. आम. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवींनी ही अडचण दूर केली. आता येथे जवळपास १ हजार मीटर मार्गात पाईप टाकण्यात आले आहेत.