
महाविकास आघाडीतदेखील रस्सीखेच, नगराध्यक्षपदासाठी ’राष्ट्रवादी शरद पवार’ पक्ष आग्रही
नगराध्यक्षपदाच्या आगामी रत्नागिरी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाचे शहर अध्यक्ष नीलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जोरदार मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, भोसले आणि कीर यांनी रत्नागिरी शहरातील पक्षकार्याचा विस्तृत आढावा, पक्षाची सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकीसाठीचे नियोजन नेत्यांसमोर सादर केले. रत्नागिरी शहरात पक्षाची ताकद आणि. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्याच उमेदवाराला द्यावी, असा आग्रह त्यांनी यावेळी धरला. शहर अध्यक्ष नीलेश – भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारालाच देण्यात यावी, यावर त्यांचे एकमत झाले. या महत्वपूर्ण भेटीप्रसंगी प्रदेश सरचिटणीस पवार, जिल्हा निरीक्षक बबन कनावजे आणि महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांचीही उपस्थिती होती.www.konkantoday.com




