
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १५ तासानंतर धीम्या गतीने सुरू
रत्नागिरी ः कोकणात पडणार्या मुसळधार पावसाने सर्व नद्यांना पुर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काल रात्रीपासून खेड येथील जगबुडी नदीला पुर आला होता. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे जगबुडी नदी पुुलावरील वाहतूक काल रात्री ८ वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. तसेच आज पहाटे चिपळूण येथील वाशिष्ठी नदीला देखील पुर आला होता. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परंतु आता पाणी ओसरल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल १५ तास बंद होती.
www.konkantoday.com