
महाराष्ट्र व्हिलचेअर क्रिकेट संघात रत्नागिरीचे जनार्दन पवार
ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे होणार्या चौथ्या राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात रत्नागिरीच्या जनार्दन पवार यांची निवड झाली आहे. पवार हे रत्नागिरी एसटीचे कर्मचारी आहेत. यापूर्वी देखील त्यांची निवड महाराष्ट्र संघात झाली होती. नुकत्याच पार पडलेल्या तेलंगणा येथील स्पर्धेसाठी त्यांचा सहभाग हाता. या सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने विजय संपादन केला होता. दिव्यांगांसाठी व्हिलचेअर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी देशभरातून विविध राज्याचे संघ सहभागी होतात. यावर्षी ५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय व्हिलचेअर क्रिकेट चॅम्पियनशीप टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरीचे सुपुत्र जनार्दन पवार यांची निवड झाली आहे.www.konkantoday.com




