
अजस्त्र लाटांमुळे मिऱया बंधाऱयाला फटका रस्ताही खचला
रत्नागिरी तालुक्यातील मिऱया पंधरामाड येथील धुपप्रतिबंधक बंधारा अजस्त्र लाटांच्या फटक्यांनी काही भागात फुटला या बंधाऱयाचा काही भाग समुद्राच्या पाण्याने गिळंकृत केला भर पावसात पंधरा दिवसांपूर्वी बांधलेला रस्ता यामुळे खचला आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही प्रश्न कायमच आहे.