
बेपत्ता व्यक्तीबाबत निवेदन
रत्नागिरी, दि.२४ (जिमाका) : श्रीमती लक्ष्मी नारायण पालकर या कुंभारवाडी मु. पो. टेरव ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथून १६ जुलै २०२४ पासून बेपत्ता आहेत. या बेपत्ता महिलेचे वय-९२, उंची ४ फूट, रंग निमगोरा, अंगाने काटक नेसणीस साधारण तांबड्या रंगाची नऊवारी साडी व हिरव्या रंगाचे ब्लाऊज आहे. या महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. ऋतिक दिलीप दाते हा हॉटेल सायली, चिपळूण येथून ०३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बेपत्त झाला आहे. वय-२१, उंच ५ फूट, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे, नेसणीस गुलाबी रंगाचे फुल हाताचे शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट असे या बेपत्ता तरुणाचे वर्णन असून गेले ६ महिने तो हॉटेल सायली येथे कामाला व रहायला होता. या तरुणाबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. सुनिता लक्ष्मण नामे या पालू नामेवाडी ता. लांजा जि. रत्नागिरी येथून २ नोव्हेंबर २०१६ पासून बेपत्ता आहेत. या बेपत्ता महिलेची उंची ४ फूट ५ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, केस साधारण पिकलेले, गळ्यात साधी माळ, कानात धातूची कुडी, नेसणीस चॉकलेटी रंगाची नऊवारी साडी असे वर्णन आहे. या महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. अंकुरी विलास शिंदे या आरगाव ता. लांजा, जि. रत्नागिरी येथून १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पासून बेपत्ता आहेत. या बेपत्ता महिलेची उंची ४ फूट ५ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, केस काळे लांब, नेसणीस काळ्या रंगाची जीन्स पँट, अंगात पिवळ्या रंगाचा हाप टॉप, कानात टॉप, नाकात चमकी, हातात ब्रेसलेट, पायात चप्पल असे वर्णन आहे. या महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.