
गेले चार दिवस रत्नागिरीतील जयस्तंभ सर्कल व परिसर अंधारात
रत्नागिरी शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहनांचे वाहतूक असलेला जयस्तंभ परिसर केले चार दिवस अंधारात आहे या सर्कलमधील हायमॅक्स चार दिवसापासून बंद आहेत मात्र याकडे काही अंतरावर असलेल्या नगर परिषदेच्या प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही सध्या रत्नागिरी शहरात काँक्रीटीकरणाचे काम चालू असून भर दिवसा वाहने चालवणे मुश्किल होत असतानाच या परिसरात संध्याकाळी या सर्कल मधील हाय मॅक्स गेले चार दिवस बंद असल्याने त्या ठिकाणाहून वाहने चालवणे मुश्किल झाले आहे