
युनायटेड कोकण टीमने दुबईतून कोकणी माणसांसाठी विशेष विमान सोडले
कोकणी माणसाने आपली भक्कम एकजूट सातासमुद्रापार दुबईत देखील दाखवून दिली आहे. गेले चार महिने दुबईत नोकरी नसलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या तरूण, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी एक विशेष विमान बुक करून त्यांना मायदेशी कोकणात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. मंगळवारी सकाळी १० वा. हे विमान दुबईतून मुंबईत आले. त्यामध्ये १३० कोकणी प्रवासी असून त्यात २० गरोदर महिलांचाही समावेश आहे. कोकणातील तरूणांनी युनायटेड कोकण टीमच्या माध्यमातून हे धाडसी काम करून दाखवले आहे.
www.konkantoday.com