रत्नागिरी बालरुग्ण कृतीदल गठीतबालकांवरील उपचारासाठी सहकार्य करा -जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

रत्नागिरी -कोविडची दुसरी लाट सुरु असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे. त्यामुळे सर्व बालरोग तज्ज्ञांनी आपल्या ज्ञानाचा फायदा संभाव्य रुग्णांना देवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हयात बालरुग्ण कृती दल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आला आहे. या कृती दलाची पहिला बैठक गुरुवारी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली.यात ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदिंची उपस्थिती होती. बालरुग्णांची व्याख्या आता नव्याने करण्यात आली. कोरोना संदर्भातील उपचारासाठी 0 ते 18 वर्षे वय असणाऱ्या सर्वांना बालक म्हणून उपचार करावेत असे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य स्तरावर देखील 14 तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या कृती दल स्थापन करण्यात आलेला आहे. शहरात स्वस्तिक रुग्णालय येथे कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे. तसेच लवकरच सुरु होणाऱ्या महिला रुग्णालयातील विस्तारित 200 खाटांच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात बालकांसाठी 5 खाटांचा अतिदक्षता कक्ष असणार आहे. एका बाजूला कोविडची तिसरी लाट येण्याची वर्तविण्यात आलेली शक्यता आणि आठवडाभरात सुरु होणारा पावसाळा या पार्श्वभूमीवर यापुढे काम होणार आहे. पावसाळयात पसरणारे इतर साथरोग आणि कोविडचे वातावरण यात बालरोग तज्ज्ञांची भूमिका मोलाची ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कृती दलात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा अध्यक्ष असून इतर रचना पुढीलप्रमाणे डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, ए.एस.सामंत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विनया घाग अध्यक्ष जिल्हा बाल कल्याण समिती, प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य असणार आहेत. तसेच आर.वी.काटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव, श्रीम.एस.ए.वीर, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी या समन्वयक आहेत. डॉ. संदीप माने, बालरोगतज्ज्ञ, डॉ. सतीश पाटील, बालरोगतज्ज्ञ, डॉ. जयंतकुमार दाभोळे, बालरोगतज्ज्ञ, डॉ. सुयार्थप्रकाश बळवंत, बालरोगतज्ज्ञ, डॉ. विजय सुर्यगंध, एसएनसीयु बालरोगतज्ज्ञ, डॉ. रोहीत पाटील,डीईआयसी बालरोगतज्ज्ञ, डॉ.संतोष बेडेकर, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. योगीता चौधरी, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. निलेश शिंदे, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. अनिरुध्द फडके, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. शिवाजी साळुंखे, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. यु.बी. चव्हाण, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. शिवाजी पाटील, खासगी बालरोगतज्ज्ञ, डॉ. संजीव माने, खासगी बालरोगतज्ज्ञ हे समितीचे सदस्य असणार आहेत.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button