
लोटेहून चिपळूणच्या दिशेने कामगारांना घेवून येणार्या एका खाजगी बसगाडीच्या वायरिंगने पेट घेतल्याची घटना
लोटेहून चिपळूणच्या दिशेने कामगारांना घेवून येणार्या एका खाजगी बसगाडीच्या वायरिंगने पेट घेतल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास घडली. नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील कामगार चिपळूणच्या दिशेने ही बसगाडी घेवून जात होती. यावेळी ही बसगाडी मुंबई-गोवा महामार्गाच्या वालोपे येथे आली असता या गाडीच्या वायरिंगने पेट घेतला. ही घटना बसचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बसगाडी एका बाजूला लावून बसगाडीतील कामगारांना बसमधून खाली उतरवले. आग आटोक्यात आणण्यासाठी चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले त्यानुसार घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल होताच त्याच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
www.konkantoday.com