देवधे येथे महामार्गावर थार‌ जीप पलटी होऊन अपघात

रस्त्यावर पडलेले दगड चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थार जीप ५० फूट दूर फरफटत जाऊन संवरक्षक कठड्यावर जाऊन धडकल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.हा अपघात सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील आसगे फाटा नजीक घडला.थार कार ( क्रमांक एम एच०१, ईबी- ७६७१) मुंबई येथून सिंधुदुर्ग-कुडाळ च्या दिशेने निघाली होती.यावर अधिक माहिती अशी की मुंबई अंधेरी कुर्ला येथील इरफान इब्राहिम मालगुंडकर (व 51 व्यवसाय छायाचित्रकार )हे अंधेरी ईस्ट कुर्ला येथून कुडाळ (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे चालले होते.

अनिसकुमार राय (राहणार मलबार हिल मुंबई) यांच्या मालकीची थार जीप घेऊन फरहान इरफान मालगुंडकर (वय २४), महरान मालगुंड क्रं (२३), अम्मार आसिफ खान (वय २६ सर्व राहणार चकालानाका अंधेरी ईस्ट कुर्ला मुंबई) हे आज सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई गोवा हायवेवर देवधे फाट्यानजीक आले असता रस्त्यावरील दगड चुकवीत असताना त्यांच्या ताब्यातील थारगाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या साईडला डिव्हाइडवर जाऊन पलटी झाली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेले नाही. अपघातात थारचे पुढील व मागील बाजूचे मोठे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button