
पन्हाळेकाजी येथील नदीत म्हैशी धुण्यासाठी गेलेल्या एका युवकाच्या पायाला मगरीने चावा घेतल्याने युवक जखमी
दाभोळ : दापोली तालुक्यातील लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेकाजी येथील नदीत म्हैशी धुण्यासाठी गेलेल्या एका युवकाच्या पायाला मगरीने चावा घेतल्याची घटना आज सायंकाळी 5 घडली असून या युवकाला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळेकाजी येथील प्राणिल जाधव हे 32 वर्षीय युवक 12 ते 13 म्हैशी धुण्यासाठी घेऊन गावातील कोटजाई नदीत गेले होते, अचानक नदीतील मगरीने त्यांच्या मांडीला मागून चावा घेतला, नदी किनारी असलेल्या प्राणिल यांच्या मित्राने या मगरीला दगड मारून हुसकावून लावले यामुळे प्राणिल यांचे प्राण वाचले, या नदीत सुमारे 100 मगरी असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून अनेक गुरांचे प्राण या मगरीने घेतलेले असून या मगरीचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून यापुर्वीही करण्यात आलेली आहे.
दरम्यान प्राणिल जाधव यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना झालेल्या जखमेवर टाके घालण्यात आले आहेत.
मी कंबरेपर्यंत पाण्यात उभा राहून म्हैशीना धूत असताना एका ६ मीटर लांबीच्या मगरीने माझ्यावर हल्ला केला, मी तेव्हा प्रतिकार केल्याने मी वाचलो असे
प्राणिल जाधव यांने सांगितले
www.konkantoday.com