
पहिले लग्न झालेले असताना देखिल पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक
लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तरुणाला रत्नागिरीशहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मोहसिन अब्दुलगनी शेख (वय ३७, रा. चर्च रोड, बाजारपेठ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२४ या कालवधीत घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मोहसिन शेख याने त्याचे पहिले लग्न झालेले असताना देखिल पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केली. पिडीत मुलीला मुलगीही झाली. या प्रकरणी पिडीत महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी (ता. ८) पोलिसांनी संशयिताला अटक केली. न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने संशयिला सोमवारी (ता. १२) पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.