
झारखंडमध्ये 43 जागांसाठी बुधवारी मतदान
झारखंड विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. त्या राज्यात आता ४३ जागांसाठी बुधवारी मतदान होईल. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत.तेथील राजकीय रणसंग्रामासाठी २ टप्प्यांत मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. त्या राज्यात एकूण २.६० कोटी मतदार आहेत. त्यातील १.३७ कोटी मतदार पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ६८३ उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल.