
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
www.konkantoday.com