
रत्नागिरी नगरपरिषद विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेधडक मोर्चा
रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाच्या बेफिकीर आणि निष्क्रीय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ‘गैरकारभाराची वरात’ नामक धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता नगरपरिषदेसमोर झालेल्या या मोर्चात शेकडो जागरूक नागरिकांनी सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला. शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वेळेत न झालेले गटार बांधकाम, पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे प्रलंबित राहणे, अशा विविध समस्यांवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला. मुख्याधिकारी गारवे यांच्याशी याआधी संपर्क साधून शहरातील समस्यांचे सादरीकरण करून भेट मागण्यात आली होती. मात्र प्रशासनाने वेळ न देत दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर आणि शहराध्यक्ष बाबय भाटकर यांनी केले.