
शासनाकडून दिलेल्या १०८ रूग्णवाहिकांचा चुकीच्या पद्धतीने, वापर, संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी – अध्यक्ष विक्रांत जाधव
शासनाकडून दिलेल्या १०८ रूग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. रूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु चुकीच्या पद्धतीने नियोजन होत असल्यामुळे गरजेच्या वेळी रूग्णांना त्या वेळेत उपलब्ध होत नाही. हा प्रकार सदस्यांच्या लक्षात आला होता. त्यावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. हे नियोजन करणार्या व्यवस्थापकांवर संबंधित विभागाने कारवाई करावी अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत.
www.konkantoday.com