
मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार टोलवाटोलवी करीत असल्याचा खासदार विनायक राऊत यांचा आरोप
मराठा आरक्षणप्रश्नी राज्यभरात पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे; परंतु या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणे चुकीचेच होते. न्यायालय ही याचिका फेटाळणार याची कल्पना होतीच; परंतु या प्रश्नावर केंद्र सरकार टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप शिवसेना सचिव व लोकसभेतील गटनेते खा. विनायक राऊत यांनी केला आहे.
चिपळूण येथे तिवरे धरणग्रस्तांसाठी बांधलेल्या सिद्धिविनायक नगरीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. ते म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली जाणे अपेक्षितच होते असंही ते म्हणाले
www.konkantoday.com
