
करबुडे बोगद्यात आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह
कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगद्यामध्ये ३० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्या आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी करबुडे बोगद्यामध्ये मृतदेह आढळला. या घटनेची तात्काळ माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. रेल्वेची धडक बसून या तरूणाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. मृत तरूणाचे वय अंदाजे ३० वर्षे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. www.konkantoday.com