
टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार
राज्यभरात शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकीचे जाळे उभारून अल्प कालावधीत हजारो कोटीचा फंड उभारणाऱ्या टीड्ब्ल्यूजेचा संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात २८ लाखांच्या फसवणूक प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता.त्यापाठोपाठ पुणे कर्वेनगर येथे २ ऑंक्टोंबर रोजी याच कंपनीच्या तब्बल २३ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ६ कोटी १० लाख २८ हजार ७६० रूपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामध्ये मुळ संचालकासह पुण्यातील कंपनीच्या प्रतिनीधींचा समावेश आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदार धास्तावले आहेत.




