
देवदर्शनासाठी आलेल्या पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू
पुणे विजयनगर येथील राहणारे प्रभाकर सदाशिव लागू (६१) हे आपल्या कुटुंबासह दापोली कोळथरे येथे श्री देव कोळेश्वर देवाचे उत्सवाकरिता आले होते. ते कोळथरे येथील एका होम स्टेमध्ये राहिले होते. परंतु त्यांना अचानक उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने खाजगी गाडीने दापोली येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
www.konkantoday.com




