
ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद दौऱ्याला १६ डिसेंबरपासून सुरुवात
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे.
१६ ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, आजी- माजी लोकप्रतिनिधी यांच्या समवेत कार्यकर्ता संवाद दौरा होणार आहे.
१६ व १७ डिसेंबर चिपळूण तालुक्यात, १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता लांजा तालुका, १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तालुका, दुपारी ३ वाजता रत्नागिरी तालुका, २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संगमेश्वर तालुक्याचा दौरा केला जाणार आहे.
या दौऱ्यादरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार असून, त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.




