
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यशाळेची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 अशी असेल.या कार्यशाळेला महाराष्ट्रातून विविध शाखेतील अध्यापक आणि प्राचार्य वर्ग उपस्थित राहणार आहे. तसेच या 5 दिवसांच्या कार्यशाळेत विविध तज्ञ आणि अनुभवी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहे.लक्षणीय बाबया कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात खास करून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी उपस्थित राहणार आहे.