
मुख्यमंत्री एक नंबरचेखोटारडे तर गृहमंत्री त्याहून खोटारडे- संजय राऊत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बलात्काऱ्याला दोन तीन चार महिन्यांपूर्वी दोन महिन्यात फाशी देण्यात आल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रश्न विचारले आहेत. पण आता याच मुद्द्यावरून राऊतांनी राज्याच्या राज्यपालांना या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे, असे आव्हान केले आहे. तर याचवेळी त्यांनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना महत्त्वाचे आवाहन केले आहेयाबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कोणत्या जागी फाशी दिली हे जाहीर करावे. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली हे सुद्धा सांगावे. एखाद्या राज्यात जर कोणाला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझे आवाहन आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि तुमच्याकडे जर काही अशी नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्रासमोर आणावे. हे मुख्यमंत्री एक नंबरचेखोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजला आहे का? महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यामध्ये घडले अकोल्यात घडले काय करत आहेत मुख्यमंत्री? असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.www.konkantoday.com