
2 किलो 29 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला अटक.
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीलाच शहरातील सरकारी पॉलीटेक्निकचे मागील बाजुस 1 लाख 22 हजार किंमतीचा 2 किलो 29 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.फैसल मकसूद म्हसकर (रा.कर्ला जामा मशिदजवळ,रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. फैसल म्हसकरला उपविभागीय दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व कोल्हापूर जिल्हयातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले होते. हद्दपार असतानाही आरोपी फैसल म्हसकरने कोणत्याही सक्षम प्राधिकार्याची परवानी न घेता रत्नागिरीत येउन सरकारी पॉलीटेक्निकचे मागील बाजुस गांजा विकताना मिळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि रत्नागिरी शहर पोलिसांनी मिळून केली.