
कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारणी जाहीर
कोकणच्या साहित्यिक विकासासाठी आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांच्या कल्पनेतून कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन झाली.अनेक वर्ष उत्तम काम केल्यानंतर अनेक शाखा तयार करण्यात आल्या. शाखा निहाय साहित्य संदर्भात काम करण्यात येते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा म्हणून नुकतीच श्रीमती नमिता कीर यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कोकण मराठी कोकण साहित्य परिषद रत्नागिरी शाखेच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
रत्नागिरी शाखेसाठी प्रा.चंद्रमोहन देसाई (अध्यक्ष ) राजेंद्र कदम (कार्याध्यक्ष) अंजली पिळणकर (उपाध्यक्ष) विद्याधर कांबळे (सचिव) गौरी सावंत (सहसचिव) राजेंद्र चव्हाण (खजिनदार) आनंद शेलार (जिल्हा प्रतिनिधी) विनायक हातखंबकर(सदस्य) , विजय साळवी (सदस्य) ,डॉ.आनंद आंबेकर(सदस्य) , श्रद्धा बोडेकर (सदस्य) शौकत मुकादम (सदस्य) , मनोज खानविलकर (सदस्य) ,गुरुदेव नांदगावकर (रत्नागिरी जिल्हा युवा शक्ती प्रमुख) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
ही कार्यकारणी २०२५ ते २०२८ या काळासाठी कार्यरत असणार आहे.




