
जागेच्या कागदपत्रावरून ढाकमोलीत मारामारी, वृद्ध जखमी
जागेच्या कागदपत्रांवरुन सुरू मारामारी सोडवताना कोयती लागल्याने वृध्द जखमी झाल्याची घटना ढाकमोली-चिंचवाडी येथे बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी एकावर सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद चंद्रकांत लाड (२८) असे गुन्हा दाखल झालेल्याचे, तर राजाराम सिताराम लाड (६०) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. प्रसाद व प्रकाश साळवी यांच्यात विहिरीवरुन भांडण सुरू होते. यावेळी प्रसाद हातात कोयती घेऊन साळवी यांच्या अंगणात आला व त्यांच्या अंगावर धावून जात होता. यावेळी राजाराम लाड हे चालू असलेला वाद सोडवण्यासाठी पुढे झाले असतां त्यांच्या हाताच्या बोटाला कोयती लागली व ते जखमी झाले. त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com




