
देवरुख बस स्थानकात महिलेच्या पर्समधील पावणे दोन लाखांचे दागिने चोरीला
गणपती सणानिमित्त बसस्थानकात उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील दागिने चोरण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहेत.गेल्या आठवडय़ाभरात खेड चिपळूण येथे महिलांच्या पर्समधील लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते.आता देवरूख स्थानकातही असाच प्रकार घडला आहे. देवरूखमधील सुनीता सुनील जुवळे या सांगली येथे घर कामे करतात त्या गणपती सणासाठी आपल्या कनकाकडी गावाला आल्या होत्या त्या सण आटाेपून सकाळी संगमेश्वर कोल्हापूर बसमध्ये चढण्यासाठी देवरुख बसस्थानकात आल्या होत्या.त्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील खण उघडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये ठेवलेले पावणे दोन लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
www.konkantoday.com