
बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध पोलिसांनी लावला
जयगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता प्रकरणातील दीप्ती दिपिकेश निंबरे (वय २९) या महिलेचा शोध गणपतीपुळे पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून लावून त्यांना सुखरूप परत आणण्यात यश मिळवले.
दीप्ती निंबरे यांच्या पतीने दि. ८ ऑक्टोबर रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गणपतीपुळे पोलीस चौकीत दाखल केली होती. त्यानंतर अपघात अन्वेषण पथकाचे एपीआय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपास अधिकारी हेडकॉन्स्टेबल १३७४ भागवत आणि मपोशी पुसाळकर यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दीप्ती निंबरे या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे असल्याचे समोर आले. पोलीस पथकाने दि. १४ ऑक्टोबर रोजी तेथे जाऊन संबंधित महिलेचा ताबा घेतला. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
गणपतीपुळे पोलीस ठाण्याच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.
www.konkantoday.com




